*****

*****

Monday, 20 February 2017

ब्लॉग उद्घाटन


पोवारवाडी (वाकरे )शाळेच्या शैक्षणिक ब्लॉगचेउद्घाटन डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते संपन्न


कुडीत्रे : करवीर तालुक्यातील १०० % शाळा गॅस जोडणी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कार्यशाळा शेतकरी सास्कृतिक भवन कुडीत्रे येथे आयोजित करण्यात आली होती . सदर कार्यशाळेत विद्यामंदिर पोवार वाडी (वाकरे ) ता. करवीर www.vidyamandirpowarwadi.blogspot.in या शाळेच्या शिक्षक साथी या शैक्षणिक ब्लॉग चे ऑनलाइन उद्घाटन डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते व पंचायत समिती करवीर (शिक्षण विभाग ) जि.कोल्हापूर www.karveereducation.blogspot.in या करवीर एड्युकेशन शैक्षणिक ब्लॉगचे उद्घाटन शिक्षणधिकारी सुभाष चौगुले यांच्या हस्ते , मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख ,गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव , गटशिक्षणाधिकारी रविंद्र चौगले . अधीक्षक वसुंधरा कदम या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी पोवारवाडी शाळेचे अध्यापक श्री. राजाराम पांडव यांनी या शैक्षणिक ब्लॉग वर शाळेचे ,तालुक्याचे विविध उपक्रम ,शासकीय योजना ,शिक्षकांना व शाळेला उपयुक्त वेब साइट याची माहिती ऑन लाइन प्रोजेक्टर वर दाखविली .शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती पोवारवाडी शाळेचे अध्यापक श्री. राजाराम पांडव यांनी केली .अध्यापक संजय जाधव , रेखा पांडव मॅडम , केंद्रप्रमुख तनुजा कोळेकर मॅडम यांचे सहकार्य लाभले .
शैक्षणिक ब्लॉग निर्मितीसाठी करवीरचे गटशिक्षणा धिकारी श्री. रवींद्र चौगले यांनी प्रेरणा दिली तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शंकर यादव ,श्री. विश्वास सुतार ,श्री.बाळासो चौगले श्री. आर . डी. पाटील , कुरणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले